जळगाव : जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर हे सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याची तक्रार दोघांनी वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. भाजपाचे जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे आणि प्रविण महाजन या दोघांनी हे निवेदन दिले आहे.
जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहणारे प्रविण अशोक महाजन हे काही कामानिमीत्त जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गेले असता त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे. आपल्याला पोलिस स्टेशनला डांबून ठेवण्यात आल्याची देखील प्रविण महाजन यांची तक्रार असून मानगावकर यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांची बदली करण्यात यावी अन्यथा 4 जानेवारी रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला कुणी अधिकारी स्वखुशीने येण्यास तयार नसतो असेही या निमित्ताने म्हटले जात आहे. जिल्हा पेठ पोलिस स्टेशन मधून इतरत्र बदली झाली तरी अधिका-याला दुख: होत नाही असे देखील या निमित्ताने म्हटले जात आहे.