नाशिक रोड (प्रतिनिधी) – येत्या १० जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रात तसेच भारतात जेथे जेथे सर्व शाखीय सोनार समाजाचा अधिवास आहे, तेथे तेथे स्थानिक सर्व शाखीय सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी सुवर्ण नियंत्रण कायदा दिनानिमित्त सुवर्ण नियंत्रण कायदा आणि सर्व शाखीय सोनार समाजावर झालेले व्यावसायिक परिणाम या विषयावर चर्चासत्र आयोजित करावे, असे आवाहन सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक श्री मिलिंद कुमार सोनार यांनी केले आहे.
चर्चासत्रात सुवर्ण नियंत्रण कायदा अस्तित्वात आल्यानंतर सोनार व्यावसायिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले, सोनार सराफ आणि सुवर्ण कारागिरी करणाऱ्या सोनार समाज घटकांवर झालेले परिणाम यावर भर देण्यात यावा, असे आवाहन देखील मिलिंद कुमार सोनार यांनी केले आहे.