घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण सुरु असतांना मांडवा हेटी येथे झालेल्या एका घटनेप्रकरणी घाटंजी पोलीस स्टेशनला शासकीय कामात अडथळा तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार एकूण आठ जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत अधिकारी विष्णू नथ्थुजी सरकुंडे यांच्या लेखी तक्रारी वरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला. 2 जानेवारी 2025 रोजी झालेल्या शाब्दिक वादानंतर उद्भवलेल्या परिस्थितीनंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिगांबर अवथळे, गोलु डोळे, अंकुश भड, उत्तम भड, मधुकर भड, ज्ञानेश्वर साठे, रंजना भड व माया साठे अशी या आठ संशयीतांची नावे आहेत. भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132, 189 (2), 121 (1) व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 3 (1) (आर), 3 (1) (s), 3 (2) (va) अंतर्गत घाटंजी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने करत आहेत.