महिलेच्या विनयभंगप्रकरणी ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील मांडवा हेटी येथे एका चाळीस वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ग्रामसेवकाविरुद्ध घाटंजी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपराध क्रंमाक 04/2025 भारतीय न्याय संहिता कलम 75 अन्वये संशयीत ग्रामसेवक विष्णू सरकुंडे यांच्याविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मांडवा हेटी या गावात रस्त्यासंदर्भात गेल्या काही दिवसापासून गावकरी उपोषणाला बसले होते. दरम्यान ग्रामसेवक विष्णु सरकुंडे यांनी एका महिलेचा हात पकडून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य आणि वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here