जळगाव : अमळनेर तालुक्यातील वावडे येथील विज कंपनीच्या सोलर प्लॅंट मधील सोलर केबल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्य पथकाने जेरबंद केली आहे. या चोरीप्रकरणी मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. गोकुळ हिरामण कोरडकर, भावडू जानकु थोरात, जिभाउ वामन थोरात (सर्व रा. रायपुर ता. साक्री जि.धुळे), गोकुळ राजेंद्र भामरे आणि राकेश धनराज पाटील (दोन्ही रा. कापडणे ता.जि. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, गोरख बागुल, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, दिपक चौधरी, महेश सोमवंशी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील चोरट्यांना तिन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली असून पुढील तपास मारवड पोलिस करत आहेत.