रोख रकमेची चोरी करणा-या दोघांना अटक

On: January 7, 2025 10:56 AM

जळगाव : घराची खिडकी तोडून रोख 1 लाख 20 हजाराची रक्कम चोरुन नेणा-या दोघा चोरट्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. मंगेश राजेंद्र शेलार आणि निलेश अनिल मोरे असे चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पिंपळगाव येथील सुनिल फकिरा काकडे यांनी मोलमजुरी करुन जमवलेली 1 लाख 20 हजाराची रक्कम घरातील कोठीत ठेवली होती. सुनिल काकडे हे पत्नीसह मोलमजुरी करण्यासाठी घरातून बाहेर गेल्यानंतर त्यांच्या घरातील कोठीत ठेवलेली रक्कम चोरी झाली होती. घराच्या खिडकीची ग्रिल तोडून आत प्रवेश करुन कुणीतरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या घटने प्रकरणि चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाअंती या गुन्ह्यातील संशयीत मंगेश राजेंद्र शेलार यास ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने हा गुन्हा निलेश मोरे याच्या मदतीने केल्याचे कबुल केले. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या पथकाने या तपास कामगिरीत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment