घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : नेर तालुक्यातील दहिफळ येथे जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत अमजद वाहि्दुल्लाह खान यांनी पांच महिन्या पूर्वी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्विकारली. सुरुवातीच्या काळात त्यांच्यासमोर विविध आव्हाने असतांनाही त्यांनी ती जबाबदारी लिलया पेलली. परिश्रम करत यांनी या शाळेत चांगली कामगिरी बजावल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमात शाळेला क्लस्टर मध्ये पहिला क्रमांक मिळाला आहे. या शिवाय यवतमाळ जिल्हा स्तरावर महादीप स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी यश मिळवले. शाळेत पाचवीच्या वर्गात शिकणा-या अरमान खान आणि झुबिया मेहविश फिरोज खान या दोन विद्यार्थ्यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळवला आहे. मुख्याध्यापक अमजद वाहि्दुल्लाह खान आणि त्यांच्या शिक्षकवृंदांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.