गावठी कट्टा बाळगणारे दोघे ताब्यात

On: January 7, 2025 3:30 PM

जळगाव : गावठी कट्टा बाळगणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्यविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश झुंबर कांबळे (भडगाव) आणि शुभम भास्कर दौणे (रा. कजगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरुवातीला आकाश कांबळे यास ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नंतर शुभम दौणे यास अटक करण्यात आली. पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे, हे.कॉ. प्रवीण भालेराव, महेश पाटील, इश्वर पाटील, सागर पाटील व दिपक चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment