जळगाव : सात बारा उता-यासह स्लॅब रजिस्टरवर आई व भावाचे नाव लावण्याकामी अगोदर अनुक्रमे पाच हजार व चार हजार रुपयांची मागणी व तडजोडीअंती तिन हजार रुपयांची लाच स्विकारणा-या तलाठ्यास जळगाव एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. नितीन शेषराव भोई असे सजा कुसुंबा येथील लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तलाठी नितीन भोई याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा पर्यवेक्षक अधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह सापळा पथकातील सहायक फौजदार सुरेश पाटील (चालक), पोना बाळू मराठे, पो.कॉ. अमोल सूर्यवंशी आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.