तरुणाच्या खून प्रकरणी पाच अटकेत

जळगाव : भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात तरुणाच्या खून प्रकरणी पाच जणांना चार गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. तसेच ताब्यातील अजून दोघांची चौकशी सुरु आहे. पुर्ववैमनस्यातून ही खूनाची घटना घडली होती. तेहरीम अहमद नासिर अहमद असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव होते.

सलमान अब्दुल मजीद पटेल ऊर्फ रमीज पटेल (रा. पटेल कॉलनी खडका रोड, भुसावळ) याला बल्लारशाह येथून तर गोळीबार करणा-या अदनान शेख युनूस, शेख साहिल शेख रशीद (रा. आगाखान वाडा, भुसावळ), अब्दुल नबी हनीफ पटेल (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) व सनीस नाईन मोहम्मद आसिफ (रा. एमआयडीसी एरिया, जळगाव) या चौघा संशयितांना मनमाड येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार गावठी पिस्टल, तिन जिवंत काडतूस व एक पुंगळी हस्तगत करण्यात आली आहे.

इतर फरार संशयीतयांना भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल, पोलिस उप निरीक्षक मंगेश जाधव, राजू सांगळे, मंगेश बेंडकोळी, हे. कॉ. विजय नेरकर, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, अनवर शेख, नीलेश चौधरी, अतुल पवार, सोपान पाटील, प्रशांत परदेशी, पोलिस कर्मचारी जावेद शहा, भूषण चौधरी, योगेश माळी, राहुल वाणखेडे व हर्षल महाजन आदींनी मनमाड येथून अटक केली. सलमान पटेल यास न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर चौघांना आज 13 जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. ताब्यातील इतर दोघांची चौकशी सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here