घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पाटीपुरा यवतमाळ जयंती समितीचे अध्यक्ष पदाकरिता नियोजन बैठकीचे आयोजन रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी मातोश्री रमाबाई आंबेडकर बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पाटीपुरा यवतमाळ येथे करण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक जुने जयंती मंडळ म्हणून पाटीपुरा जयंती उत्सव समितीकडे पाहिले जाते. सदर बैठकीला पाटीपुरा, अंबिका नगर, अशोक नगर, आंबेडकर नगर, सेजल रेसिडेन्सी परिसरातील 300 च्या वर नागरिक सहभागी झाले होते.
सदर मीटिंगचे अध्यक्ष म्हणून रवी वासनिक तर संयोजन म्हणून नितीन मेश्राम यांनी कामकाज पाहीले. बैठकीमध्ये सर्वानुमते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पाटीपुराचे अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते ॲड. राहुल पाटील यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर बैठकीचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक रवी वासनिक यांनी सर्वांसमक्ष ॲड. राहुल पाटील यांचे नाव जाहीर केले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. ॲड. राहुल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले व तब्बल 14 दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही वैचारिक व सांस्कृतिक दृष्ट्या उत्साहात साजरी केली जाईल असे संबोधन केले.
सदर बैठकीमध्ये परिसरातील दिलीप गायकवाड, उमेश मेश्राम, देवेश राऊत, पद्माकर घायवान, तीलोतमा बेले, गौतम चव्हाण, संदेश दुपारे, हरीश रामटेके, सुरेंद्र वाकोडे, सुनील वाघमारे, प्रकाश नरगडे, सुधीर देशभ्रतार, बाबू गणवीर, बालूभाऊ बेले, पराग मेश्राम, विशाल गायकवाड, रोनल फुलझले, महेन्द्र ढेपे, आशा दुधे, शोभना कोटंबे, रविता भवते, ज्योती खोब्रागडे, माधुरी ढेपे, भीमाबाई पाटील,सुनंदा पानतावणे, शालिनी घायवान, वंदना उरकुळे, रुखमा अघम, कविता पाटील, नलिनी सोनडवले, मंजुषा रामटेके, खुशी राऊत, सोनू दहिकर, करुणा देठे, सुमन उके, श्वेता कांबळे, संगीता तिरपुडे, दर्शना मेश्राम, राकेश पाटील, नितीन रामटेके, विकी बलवीर, गौतम डोंगरे, विक्की डोंगरे, संजय कसारे, मयूर ढोले, योगेश बोरकर, आशुतोष वासनिक, प्रशांत पाझारे, ॲड. सनी उके, सुमेध वासनिक, मिलिंद मेश्राम, रितेश देशभ्रतार, रितेश मुन, प्रितम वासानिक, संघर्ष गायकवाड, कुणाल ढोले, कुणाल चव्हाण, अक्षय खोब्रागडे, कुणाल नागदिवे, जयुष पाटील, अक्षय बेले, मंगेश दहिकर, तेजस कांबळे, उत्कर्ष वाणे, रोशन पाटील, विकी रामटेके, ऋषभ रामटेके, मीत धाकडे, कुणाल सहारे, अमोल गडपायले, सुरज पाटील, हिमांशू बोदिले, हिमांशू देशभ्रतार, श्रेयस खोब्रागडे, नितीन खंडारे नितीन मुंगले, बाबू रामटेके, प्रसाद रामटेके, आशिष ढोले, रोशन बुरकुंडे, आकाश पेटकर, आचल नरगडे, प्रवेश कांबळे, अजय मेश्राम, रुपेश डोंगरे, अक्षय टेंभुर्णे, मिथुन डोंगरे, अजय दांडेकर, अजय सूनकुटवार, राजेश चव्हाण, वीरेंद्र देशपांडे व इतर नागरिक उपस्थित होते.