जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दोघा चोरट्यांना त्यांच्या ताब्यातील चोरीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल असलेला मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
दिपक दयाराम रूम आणि दिपक एकनाथ शेले अशी अटक करण्यात आलेल्या मोटरसायकल चोरट्यांची नावे आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता 15 जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंदुकांत धनके, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास मारोती सातदिवे, किशोर पाटील, योगेश ठाकरे, अफजल बागवान व शनिपेठ पोस्टेचे पोकॉ अनिल कांबळे, पराग दुसाने आदरणीय कामगिरीत सहभाग घेतला.