जळगाव : गांजा घेऊन येणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या अशा दोघांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन अशा दोघांच्या संयुक्त पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
चोपडा शिरपुर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ सापळा रचून विजय देवराम मोरे आणि अविनाश भिका पाटील अशा दोघांना त्यांच्या ताब्यातील साडेचार किलो गांजा सह अटक करण्यात आली. गांजा दोन मोटरसायकल आणि दोन मोबाईल असा एकूण दोन लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.