प्रहार जिल्हाध्यक्ष बनावट नोटा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात

On: September 8, 2020 2:32 PM

हिंगोली : प्रहार जनशक्ती पक्षाचा पांढरकवडा-वणी जिल्हाध्यक्ष विलास पवार यास पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले असून त्याची बनावट नोटा प्रकरणी चौकशी सुरु आहे. हिंगोलीच्या बनावट नोटा प्रकरणी हिंगोली शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने पांढरकवडा येथून त्याला मध्यरात्री ताब्यात घेतले आहे.

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरीच्या एका प्रकरणात देखील त्याची चौकशी सुरु आहे. शस्त्र कायद्यानुसार देखील पवार याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे म्हटले जात आहे. विलास पवार हा यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील रहिवासी असून सध्या पांढरकवडा येथे राहतो. वाळूतस्करी, कथित ‘सीए’ची ३५ लाख रुपयात फसवणूक व एक कोटीच्या अन्य एका प्रकरणासह बनावट पदव्यांच्या प्रकरणात विलास पवार याचे नाव चर्चेत होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment