कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत 15 ते 20 जण मृत्युमुखी

जळगाव – मुंबईच्या दिशेने जाणा-या पुष्पक एक्सप्रेसच्या काही डब्यांना आज दुपारी आग लागल्याची अफवा पसरली. गाडीचे चाक आणि ब्रेक यांच्यातील घर्षणामुळे स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याच्या गैरसमजातून भीतीपोटी गाडीतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

परधाडे या गावानजीक गाडी थांबल्यानंतर भयभीत झालेल्या प्रवाशांनी दुसऱ्या ट्रॅकवर उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी पलीकडून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना उडवले. जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे नजीक ही भीषण घटना घडली. जवळपास 15 ते 20 जण या घटनेत मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आपल्या पथकाला घटनास्थळी रवाना केले. मरण पावलेल्या प्रवाशांना जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here