सहायक फौजदाराने स्वत:वर झाडली गोळी

On: September 8, 2020 6:15 PM

जालना : जालना पोलीस मुख्यालयात आज सकाळी सहायक फौजदाराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. सुभाष गायकवाड असे गोळी झाडून आत्महत्या करणा-या सहायक फौजदाराचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे जालना पोलिस मुख्यालयात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील चौकशी सुरु केली. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड आज सकाळी 8.45 वाजता स्कॉटिंग केल्यानंतर पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात आले होते. शस्त्रागार विभागाच्या मागे जाऊन त्यांनी स्वतःवरच गोळ्या झाडून घेतल्या. त्यात ते मृत्युमुखी पडले. या घटनेमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment