खूनाच्या गुन्ह्यातील दोघांना अटक

जळगाव : पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात ठेवून मुकेश शिरसाठ याच्या खून प्रकरणातील उर्वरीत दोघा संशयित आरोपींना रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आज अटक केली. राहुल ऊर्फ प्रेम शांताराम सोनवणे आणि शैलेश ऊर्फ पंकज शांताराम सोनवणे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सहा जणांना यापूर्वी अटक करण्यात आली असून अटकेतील एकूण संशयित आरोपींची संख्या आता आठ झाली आहे. 

रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना समजलेल्या माहितीच्या आधारे जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावरील बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात दोघे संशयित आरोपी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक फौजदार संजय काळे, पोहेकॉ इरफान मलिक, पोना हेमंत कळसकर, पोना रेवानंद साळुखे, पोकॉ रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी आदींचे एक पथक तयार करून रवाना केले होते. या पथकाने दोघांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here