घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा येथे दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसीम पठाण, तंटामुक्ती गांव समितीचे अध्यक्ष अबरार शेख, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष जलाल सोलंकी व सदस्य हाफिज साजिद, मुख्याध्यापक नादिर सर, समिती सदस्य व गावातील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्ग एक ते सातच्या विद्यार्थ्यांनी विविध पदार्थाच्या स्टॉल लावले होते. शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक, माता पालक हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक यांनी विविध स्टॉलचे बनवलेले पदार्थाच्या आस्वाद घेतला. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक नादिर सर, शिक्षक मोहसीन चव्हाण सर, शमीम मॅडम, सितारा मॅडम आदींनी परिश्रम घेतले.