घाटंजी शहरातील जुगार अड्ड्यावरील धाडीत सात लाखांचा मुद्देमाल जप्त

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरातील चेंगड जुगार अड्ड्यावर धाड टाकून घाटंजी पोलिसांनी १६ जुगारींना ताब्यात घेत जवळपास 6 लाख 82 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. घाटंजी पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरुन 16 आरोपी विरुद्ध अपराध क्रंमाक 35/2025 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घाटंजी पोलिसांना  मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन, घाटंजी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व ठाणेदार निलेश सुरडकर यांनी धर्मशाळा वार्डात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन धाड टाकली असता, आरोपी निखील संजय खांडरे (वय 30 वर्ष रा. धर्मशाळा वार्ड) निकेश सुभाष ताबारे (वय 30 वर्ष रा. वसंतनगर) मयुरेश सुधाकर राऊत (वय 24 वर्ष रा. जलाराम वार्ड), सुरज राजु भोजवार (वय 25 वर्ष रा. मारोती वार्ड), राहुल प्रभाकर मस्के (वय 28 वर्ष रा. दुर्गामाता वार्ड), अक्षय संजय महल्ले (वय 29 वर्ष रा. डोर्ली – पारवा), विजय यशवंत खडसे (वय 40 वर्ष रा. झुली चौकी) , विठ्ठल सदाशिव कुळसंगे (वय 44 वर्ष रा. अंजी नृसिंह), बाळु दशरथ चव्हाण (वय 50 वर्ष रा. आमडी) , किरण गुरूदेव राठोड (वय 25 वर्ष रा. किन्ही), अतुल संजय कडु (वय 32 वर्ष रा. आमडी) , प्रफुल उल्हास राठोड (वय 24 वर्ष रा. किन्ही) , दिगांबर मोतीराम राठोड (वय 45 वर्ष रा. मोवाडा), किशोर दशरथ राठोड (वय 40 वर्ष रा. आमडी), संदीप रमेश निकोडे (वय 31 वर्ष रा. बेलोरा) व चुंडमनी पुंजाराम निमसरकार (वय 55 वर्ष) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या जुगारींची नांवे आहेत. या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून

मिळालेल्या माहितीनुसार, घाटंजी शहरातील मध्यवस्तीत चेंगड नावाचा जुगाराचा प्रकार चालू होता. याबाबतची गोपनीय माहिती घाटंजी पोलिसांना मिळतात घाटंजी पोलिसांनी सापळा रचून चेंगड नावाच्या जुगार अड्ड्यावर घाड टाकली. यावेळी जुगार खेळणारे 16 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 12 मोबाईलसह सहा दुचाकी आणि रोख असा एकूण 6 लाख 82 हजार हजार रूपयाचे मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. घाटंजी पोलिस ठाण्याचे ठाणेदार व पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राजेश पंडीत पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here