आजचे राशीभविष्य (9/9/2020)

On: September 9, 2020 8:21 AM

मेष

सद्यस्थितीत तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्थिर आहात. त्यामुळे इतरांसमवेत तुम्ही कसे वागता व बोलता त्याबाबत सावध राहणेच योग्य राहील.

वृषभ

आज तुम्ही करमणुकीत रममाण व्हाल. मैदानावरील स्पर्धेत तुम्ही सहभागी व्हाल. आर्थिकदृष्ट्या देखील तुम्ही मजबूत होण्याची शक्यता आहे.

मिथुन

तुमचे व्यक्तिमत्व आज सर्वांना प्रभावित करेल. दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल.

कर्क

व्यस्त दिवस असला तरी आरोग्य उत्तम राहील. काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही व तुमचा जोडीदार पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडाल.

सिंह

विवाह बंधनात अडकण्यासाठी हा उत्तम काळ आहे. आज रोमँटीक मुड असण्याचे संकेत प्रबळ आहेत. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा आजचा चांगला दिवस आहे.

कन्या

कामाच्या ठिकाणी गतिमान व प्रगतीशील बदल करण्यास सहका-यांचा चांगला पाठींबा लाभणार आहे. गैरसमजात कठीण काळ गेल्यानंतर आज तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

तुळ

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे होणार आहात. व्हाल. तुम्ही पार्टी देणार असाल तर तुमच्या चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे खुप जण आज असतील.

वृश्चिक

मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जावून आनंद घ्याल. आज तुमच्या कष्टाचे चीज होणार आहे. बऱ्याच दिवसापासून व्यस्त असलेल्या लोकांना आज स्वतःसाठी वेळ मिळेल.

धनु

आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी आज चांगला दिवस आहे. आज तुमची व्यस्त दिनचर्या असली तरी कुटूंबासाठी वेळ द्याल.

मकर

तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंददायक ठरेल. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत केली तर तुमचा गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील.

कुंभ

तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा असली तरी कामाचा ताणतणाव वाढल्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. संधीची वाट बघण्यापेक्षा स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या.

मीन

आज तुम्ही एखाद्या सहलीला जाण्याची शक्यता आहे. सहलीमुळे तुमची ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment