विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते फॉरेन्सिक वाहनांचे उद्घाटन

On: January 30, 2025 8:16 PM

जळगाव : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आज जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी आले होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राउंडवर आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवून त्यांचे उद्घाटन करण्यात आले. 

दि. 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडला होता. त्यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी आठ मोबाईल फॉरेन्सिक वाहने देण्यात आली. या मोबाईल फॉरेन्सिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ही वाहने जळगाव जिल्हा पोलीस दलात समाविष्ठ करण्यात आली. 

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले की, गंभीर गुन्हा तपासण्यासाठी विशेषत सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी घटनांस्थळावर त्वरित भेट देवून फॉरेन्सिक सहाय्य पुरवण्यासाठी, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी या मोबाईल वाहनांचा उपयोग होणार आहे.

यावेळी दत्तात्रय कराळे यांच्यासह पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, श्रीमती कविता नेरकर, जिल्हयातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment