गोवंशने भरलेला ट्रक उलटल्याने पाच पशुधन मृत्युमुखी

Oplus_131072

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पारवा ते रामनगर मार्गावरील पुलाजवळ गोवंश ने भरलेला ट्रक उलटल्याने ५ जनावरांचा त्यात मृत्यू झाला. पारवा पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलीस शिपाई अमोल जयवंत वाढई (वय ३९, पोलीस स्टेशन पारवा) यांच्या तक्रारीवरुन ट्रक क्रंमाक एम. एच. ३१ एफ. सी. ४८६१ चे चालका विरुद्ध अपराध क्रंमाक ४३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २८१, ३२५ महाराष्ट्र पो. अधिनियम कलम ११ घ, ड, च, ज, झ प्राणी छळ अधिनियम १९६० कलम ५ अ, ५ ब व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह कलम १८३ मो. वा. का. अंतर्गत पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा सहाय्यक पोलीस उप निरीक्षक रायके यांनी नोंदविला. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल वानखडे तपास करीत आहे.

ट्रक क्र. MH ३१ FC ४८६१ चे चालकाने त्याचे वाहनात १९ गोवंशीय बैल निर्दयतेने व कृ्रतेची वागणुक देवुन कोंबुन ट्रक मध्ये भरुन कत्तली करीता घेवुन जात असतांना पारवा ते रामनगर जाण्या-या पुलाजवळ भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन अपघात घडवुन आणला. ट्रक मध्ये असलेले १९ गोवंशीय जनावरे मधुन ५ जनावरे मरण पावले. १९ गोवंशीय जनावरे अंदाजे किं. ३,८०,००० रुपयेचे व ट्रक क्र. MH ३१ FC ४८६१ अंदाजे किंमत २५,००,००० (पंचवीस लक्ष रुपये) रुपये असा एकुन २८,८०,०००रुपये (अठ्ठाविस लक्ष ऐंशी हजार रुपये) जप्त करुन ताब्यात घेतला. चारा पाण्याच्या सोयीसाठी व सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पांढरकवडा येथील श्री. गौरक्षण संस्था पांढरकवडा येथे ठेवण्यात आले आहे. गोपनीय शाखेचे पोलीस शिपाई अमोल वाढई यांच्या लेखी तक्रारी वरुन अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल वानखडे तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here