घाटंजी येथे १८ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा

घाटंजी (यवतमाळ) : शिवजयंती उत्सव समिती, घाटंजीच्या वतीने दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता लोकगीतावर आधारित राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे यांचे हस्ते होणार आहे. या वेळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम खांडरे, माजी उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, कंत्राटदार सतीश भोयर,  माजी नगरसेवक संगीताताई भुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय गोडे, नगर परिषदेचे माजी सभापती संदीप बिबेकार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

स्पर्धेचे प्रथम बक्षीस २०,००० रुपये, द्वितीय १०,००० रुपये, तृतीय ५,००० रुपये, चतुर्थे ३,००० रुपये व १५०० रुपयांची सहा प्रोत्साहन पर बक्षीस ठेवण्यात आली आहे. समूह नृत्य स्पर्धेची ऑडिशन ऑनलाइन असून स्पर्धकांना दिलेल्या नंबर वर दिनांक पाच फेब्रुवारी पर्यंत आपल्या नृत्याचा व्हिडिओ पाठवायचा आहे.  

नृत्य स्पर्धे करता किमान पाच व जास्तीत जास्त 15 स्पर्धकांना भाग घेता येईल. शिवाजी महाराजावरील व देशभक्तीपर चित्रपटातील गीत घेता येईल. यासह अधिक माहिती करता ९४०४३७२७०१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन, शिवजयंती उत्सव समिती घाटंजीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here