चार लाखांच्या नकली नोटा बाळगणाऱ्या तिघांना अटक

शिरपूर : शिरपूर येथे 4 लाख 11 हजार रुपये किमतीच्या नकली नोटा बाळगणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुंडलिक उर्फ समाधान नथा पदमोर (रा. हट्टी, ता. शिरपूर), पिरन सुभाष मोरे (रा. चांदपुरी, ता. शिरपूर) आणि रंगमल रतिलाल जाधव (रा. ऐंचाळे, ता. साक्री) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 

अटकेतील तिघांकडून त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल सह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . शिरपुर येथील खालचे गावात रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमएच 18-सीबी 8567 क्रमांकाच्या मोटर सायकल वर तिघे संशयितरित्या फिरत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. झडती दरम्यान त्यांच्याकडील बँगेमध्ये भारतीय चलनाप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या 4 लाख 11 हजार रुपये किमतीच्या 823 नकली नोटा आढळून आल्या. मोबाइलसह दुचाकी, असा एकूण 5 लाख 46 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here