एसटी बसला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू 

यवतमाळ (घाटंजी) : भरधाव दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या बसला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघाती घटनेत दुचाकी चालक जागीच ठार झाला असून बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. शिरोली ते दहेगाव दरम्यान मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली.

किनवट आगाराची बस क्र. (एमएच २० बी एल १९८१) ही बस किनवट येथून यवतमाळ, मांडवी, पाटापांगरा, घाटंजीच्या दिशेने सकाळी आठ वाजता मार्गस्थ झाली होती. दरम्यान साडे दहा वाजताच्या सुमारास शिरोली ते दहेगाव दरम्यान घाटंजी वरून दुचाकी चालकाने वेगात येऊन एस.टी. बसला समोरून जोरदार धडक दिली.

दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बसचालकाने बस रस्त्याच्या खाली नेली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याच्या मोटारसायकलचा क्र. (एमएच ४० वी पी ७८०४) असा आहे. मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

बसचालक सुभाष सायन्ना कनकावार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकी चालकाविरोधात कलम १०६, २८१, १२५ (अ) (बी) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार निलेश सुरडकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रवीण तालकोकुलवार, देवानंद बन्सोड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here