नाशिक : उसनावारीचे शंभर रुपये पुन्हा मागितल्याचा राग मनात धरून टोळक्याने केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. निलगिरी बागेच्या मैदानावरील हेलीपॅडभोवती सहा जणांच्या टोळक्याने श्याम राजू कुचेकर या तरुणाला शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत श्याम गंभीररीत्या जखमी झाल्याने तो मृत्युमुखी पडला.
या घटनेप्रकरणी आडगाव पोलिसांनी श्यामची आई मंजुळा कुचेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टोळक्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. निलगिरी बागेतील घरकुल वसाहतीमध्ये राहणाऱ्या श्याम कुचेकर याने संशयित सुनील मोरे याच्याकडे उसनवार दिलेले शंभर रुपये पुन्हा मागितले होते.
या घटने प्रकरणी पोलिसांनी सहा संशयिताना ताब्यात घेतले असून काही जणांवर गुन्हे दाखल आहेत. मृत्यू झालेल्या युवकाविरुद्ध यापूर्वी चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत.