जळगाव : मोटार सायकल चोरीचे नऊ गुन्हे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणले आहेत. चोरीच्या एकूण 15 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून मोटार सायकल चोरट्यास अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीसह जळगाव शहरातील रामानंद नगर व जिल्हा पेठ तसेच धुळे मोहाडी नगर पोलीस स्टेशन परिसरातील मोटरसायकल चोरीचा उलगडा झाला आहे.
विकी नंदलाल भालेराव (रा. वाघ नगर जळगाव) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या पथकातील पोउपनिरी राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोना प्रदिप चौधरी, पोना विकास सातदिवे, पोकॉ रतन गिते, राहुल घेटे, योगेश बारी, योगेश घुगे आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.