कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम स्थानबद्ध

घाटंजी (यवतमाळ) : अवधुतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम उर्फ इसराम पवार (वय ४९, अमराईपुरा, यवतमाळ) यांस एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. 

सन २०१३ पासुन कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम यांचा गुन्हेगारी अभिलेख आहे. त्याचेवर खुन करणे, दरोडा टाकणे, घातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे अवधुतवाडी पोलीस स्टेशन व लोहारा पोलीस ठाण्यात नोंद होती. अवधुतवाडी पोलीसांनी प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर ही आरोपी साहेबराव उर्फ नितीन विश्राम यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे अवधुतवाडी पोलीसांनी एमपीडीए (MPDA) चा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्फत जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांचेकडे सादर केला. एमपीडीए  (MPDA) चा प्रस्ताव मंजूर होतात अवधुतवाडी पोलीसांनी आरोपी साहेबराव उर्फ नितीन विश्राम यांस अटक करुन भंडारा येथील जिल्हा कारागृहात १ वर्षासाठी स्थानबद्ध केले. सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने (यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक नरेश रणधीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धैर्यशील घाडगे, पोलीस शिपाई विशाल भगत, बलराम शक्ला, रूपेश ढोबळे, मोहंमद भगतवाले, प्रतीक नेवारे आदींनी केली. या कारवाई मुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here