रावेर येथील घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस

जळगाव : रावेर पोलिस स्टेशनला दाखल घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना अटकेतील तिघा संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार चार गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यातील संशयित आरोपी रावेर तालुक्यातील तर इतर चौघे पर जिल्ह्यातील आहेत.

मिठू सटवा काळे (रा. घाणेगाव जंब समर्थ कुभार पिंपळगांव ता घनसावंगी जि जालना), संदीप बबन चव्हाण (रा. रेल्वे स्टेशन जवळ परतुर जि. जालना, राकेश सिताराम काळे (मंगळुर मानद जि परभणी) अशा तिघांना रावेर येथील विद्यानगर येथील घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासात अटक करण्यात आली होती. तिघांनी दिलेल्या कबुलीनुसार घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी रावेर तालुक्यातील निरुळ येथील घरफोडीच्या गुन्ह्यात अहिरवाडी येथील सिताराम गणपत भिल यास अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 8500 रुपये किमतीची ईलेक्ट्रीक मोटर जप्त करण्यात आली आहे. एकूण 22 हजार 540 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक घनश्याम तांबे, पोहेकॉ सुनिल वंजारी, पो. कॉ. संदीप घ्यार, पोकॉ सचिन घुगे, पोकॉ विशाल पाटील, पोकॉ प्रमोद पाटील, सुकेश तडवी, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, श्रावण भिल यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास अनुक्रमे महिला पोलिस उप निरीक्षक प्रिया वसावे, पो. कॉ. घनशाम तांबे, महिला पोलिस उप निरीक्षक दीपाली पाटील, हे. कॉ. सुनील वंजारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here