कंगनाचे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात

On: September 9, 2020 11:58 AM

मुंबई : अभिनेत्री कंगणा रणौत हिच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा पडण्याच्या कारवाईस सुरुवात झाली आहे. कंगणा रणौत आणी शिवसेना यांच्यातील वाद आता शमण्याची चिंन्हे दिसून येत नाही. मंगळवारच्या दिवशी महापालिका अधिकाऱ्यांनी कंगनाच्या पाली हिल येथील निवासस्थानाबाहेर नोटीस डकवली होती. आज तिच्या कथीत कार्यालयावर कारवाई होण्याची शक्यता दिसून येत होती. ती शक्यता सुरु झालेल्या कारवाईने संपुष्टात आली आहे.

कंगनाच्या निवासस्थानी कार्यालयाचे अवैध बांधकाम करण्यात आले असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर केल्याचे त्या नोटीस मधे नमुद केले आहे. अधिनियम ३५४ अ अंतर्गत ही नोटीस बजावण्यत आली होती. या नोटिसची मुदत २४ तास एवढी होती. ती मुदत आज सकाळी साडे दहा वाजता संपुष्टात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment