घरफोडीच्या आरोपी कडून सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत

घाटंजी (यवतमाळ) : सोन्याचे मंगळसूत्र चोरी प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेच्या तपासादरम्यान एका अल्पवयीनास ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता त्याने त्याच्या इतर साथीदारांची नावे कबुल केली. त्यांच्याकडून 29.600 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हस्तगत करण्यात आले आहे.

शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बांगरनगर येथील रहिवासी तक्रारदार सुजर बैस घरी नसतांना त्यांच्या घरात 27 डिसेंबर रोजी चोरी झाली होती. ते यवतमाळ येथे परत आल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. घराच्या कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र त्यांना आढळून आले नाही.

परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक रोहीत ओव्हाळ, उप विभागीय अधिकारी दिनेश बैसाने तसेच पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आत्राम, पोहेकॉ रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, पोलीस नायक मिलींद दरेकर, पोलीस शिपाई प्रदीप कुराडकर, गौरव ठाकरे, अभिषेक वानखडे, अश्वीन पवार आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here