जळगाव : एक लाख रुपये किमतीचा घोडा चोरी करणा-या मुलांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या कब्जातून चोरीचा घोडा देखील हस्तगत करण्यात आला आहे. चोरीचा घोडा मुळ तक्रारदार मालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
घोडा बग्गीचा व्यवसाय करणारे कृष्णा आनंदा जोशी यांच्या मालकीचा घोडा कुसुंबा शिवारातील मोकळ्या जागेतून चोरी झाला होता. या चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अधिपत्याखाली सुरु होता. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर, पो कॉ नितीन ठाकुर, राहुल घेटे, सिध्देश्वर डापकर यांनी या तपासकामी सहभाग घेतला.