केजरीवालांच्या अस्तानंतरचे राजकारण

आम आदमी पक्षाचे सर्वोसर्वा नेते अरविंद केजरीवालांच्या अस्ताानंतर त्यांना बहुदा मोदी सरकार जेलमध्ये टाकतील असे भाजपाई पत्र पंडित म्हणून लागले आहेत. भारतीय राजकारणात केवळ देशात भ्रष्टाचार नको म्हणत India against corruption म्हणत ते सत्तेवर आले होते. त्यांच्या पराभवानंतर मोदींचा भाजपा, आरएसएस, काँग्रेस मधील एक वर्ग, आप मधील एक वर्ग खुष झाल्याचे म्हणतात. त्यांचे जवळचे मित्र कविराज अण्णा हजारे, बाबा रामदेव, काही काँग्रेसजनातील नेते, राहुल गांधी दिल्लीच्या पूर्व सीएम आतिशी यादेखील खुश झाल्याचे म्हणतात. केजरीवालांच्या पराभवानंतर त्यांचा हर्षोल्हासीत व्हिडिओ बाहेर आला. 

तसे पाहिले तर आम आदमी पार्टीची कोणतीही विचारसरणी किंवा तत्त्वज्ञान नव्हते. काँग्रेस किंवा भाजपा या प्रस्थापितांचा भ्रष्टाचार आम्हास नको असे म्हणत त्यांनी दिल्लीत सत्ता स्थापिली. पण केजरीवालांनी नेहमी राजकारणात जे चालते ते म्हणजे स्वतःपेक्षा कुणाला मोठे होऊ दिले नाही. भाजपात मोदीजी, शहा, फडणवीस हेच करतात म्हणे. पण आता लोकांनाच भ्रष्टाचाराची सवय झाली आहे. प्रस्थापित नोकरशाही भ्रष्ट झाली आहे. नोकरशहा रोज पैसे घेताना पकडले गेले तरी खुर्ची (पद) सोडत नाही. अनैतिक सत्ता असली म्हणजे असे होते म्हणतात. कोणाचाही करिश्मा केवळ 15 ते 20 वर्षे चालतो. लोक त्या करिशम्यामागे धावतात. लोकांची, काही राजकारण्यांची कथनी आणि करणी यात महद अंतर असते म्हणे. 

भ्रष्टाचार विरोध हे बोलण्यापुरते ठीक वाटते पण लोकशाही नामक खटार्‍यात काही भ्रष्ट लोक बसवून बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्या नावाचा खेळ करताना लोकशाही आठवली जाते. नेते मनमानी करतात हे लोकांनी इंदिराजींच्या काळापासून पाहिले. त्याच मुशीत सोनियाजी, राहुल गांधी तयार झाले म्हणतात. त्या नेत्यांना पराभव झाला तरी पक्षाची सुत्रे सोडायची नसतात. त्रिपक्षीय किंवा बहुपक्षीय युती किंवा आघाडी कडून देश आता एकपक्षीय भाजपा राजकारणाकडे निघाला असे सुचवणारा हा काळ आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट राजकारण्यांविरुद्ध आरएसएस आवाज उठवत असल्याचे लोकांना वाटले. पण काँग्रेस मधूनही एका गटाने त्यात भाग घेतला होता म्हणे. आजही राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होऊ इच्छितात. काल केजरीवाल होऊ इच्छित होते. यांना या स्वप्नाने पछाडल्यामुळेच ते वाराणसीत मोदीजी विरुद्ध लढले, पडले, जिंकले असे स्वप्न घेऊन मोदीजींचा पर्याय म्हणजे आप म्हणजे आपण असे त्यांना वाटले असावे. 

नेत्याने कितीही देखावा केला तरी त्याच्या तकलादू आदर्शाची सालपटे 15 वर्षानंतर निघतातच असे म्हटले जाते. इथे तर काँग्रेसने भ्रष्टाचार करावा, भाजपने भ्रष्टाचार करावा आणि “आप” ने त्याचा विरोध करावा एवढेच माफक उद्दिष्ट घेऊन आप हा तिसरा पर्याय पुढे केला होता. आता केजरीवाल कसे भ्रष्ट होते ते सांगितले जाईल. इतरांना भ्रष्ट दर्शवून आपण तेवढे साफ – स्वच्छ ठरवण्याचे दिवस आले आहेत. ईव्हीएमचा वाद मागे पडला. चोरलेली मते, एवढे 70 लाख मतदान कसे? हेही मागे पडले. लोक केव्हातरी भाजपाला, त्यांच्या हिंदुत्वाला कंटाळून आपली निवड करतील हा भ्रामक आशावाद घेऊन काँग्रेसची, राहुल गांधींची मगरूरी अजून कमी होत नाही-नष्ट होत नाही असे म्हटले जाते. लोकांना म्हणजे जनतेला काय देतात? पैसा धो धो सोडावा लागतो, भाजपने देशाची निवडणूक (लोकसभा) जिंकण्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरीही विकत घेतले. सर्व सत्ता, लोकशाहीचे सर्व आधारस्तंभ मिंधे केल्याचे म्हणतात. सर्वजण विकले जाणारे नसले तरी स्वतःची किंमत वसूल करण्यासाठी मोठा जमावडा सत्तेकडे निघाला आहे. कोणीच विरोधात राहायला तयार नाही. हाडवैरी गळ्यात गळे घालतात. सर्व राजकारणी खोटे बोलतात. उत्तम नाटक वठवतात. पब्लिक म्हणजे जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत बसली आहे. लोकशाही मॉडेल हे नेत्यांसाठी आहे हे जनतेच्या लक्षात येईल तो सुदिन…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here