जळगाव : चाकूने भोसकल्याने जखमी झालेल्या तरुणाचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला. मध्यरात्री झालेल्या या घटने प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला संशयित तरुणाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा शहरातील बाहेर पुरा भागात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. संशयित मारेकरी तरुणास अटक करण्यात आली आहे.
पाचोरा शहरातील छत्रपती चौकात मध्यरात्री 12 वाजेनंतर शिवाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक आटोपल्यानंतर हेमंत संजय सोनवणे या तरुणावर रोहित गजानन लोणारी या तरुणाने प्राणघातक चाकू हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात हेमंत सोनवणे हा तरुण जखमी झाला. वैद्यकीय उपचारार्थ त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारार्थ त्याला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह त्यांचे तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.