बायोडीझलच्या दोन टँकर सह चौघांना अटक

जळगाव : मानवी आरोग्यास व जिवीतास धोकादायक असणारा ज्वलनशील पदार्थ असलेल्या बायोडिझलची अवैध विनापरवाना वाहतूक करणाऱ्या चौघांना त्यांच्या ताब्यातील दोन टँकरसह अटक करण्यात आली आहे. सद्दाम सैयद अकबर (रा. बच्छाव, गुजरात), क्लिनर सुलेमान इलीयास छेरेया (रा. वरसाना कच्छ – गुजरात, चालक लतीफ भाई फकिर हिंगोरजा (रा. कच्छ गुजरात, क्लिनर ज्ञानेश्वर भारत शिजुळ (रा. मेहकर – बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. 

गुजरात राज्यातुन बायोडिझल भरलेले दोन टँकर जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाने रवाना होणार असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोलिस उप निरीक्षक चंद्रकात धनके, अशोक काळे, पोना विकास सातदिवे, पोकॉ शशिकांत मराठे, राहुल घेटे, नितीन ठाकुर, डापकर यांचे पथक तयार करुन कारवाई कामी रवाना केले. 

जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते अजिंठा चौक दरम्यान पोलीस पथक दबा धरून बसले होते.  रात्रीच्या वेळी अजिंठा चौकात संशयास्पद असलेल्या क्रमांकाचे दोन टँकर आढळून आले. या टँकरची पोलिस स्टेशनला आणून इंडियन ऑईल, जळगाव व सर्वोदय सव्हिस स्टेशन, जळगाव यांच्या तज्ञांकडुन तपासणी करण्यात आली. त्यात विनापरवाना बायोडिझेल साठा आढळून आला. दोन्ही टँकरचा जप्ती पंचनामा पुरवठा निरीक्षण अधीका-यांच्या मदतीने करण्यात आला. अटकेतील चौघांना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेंद्र कांडेकर व पोहेकॉ रविंद्र परदेशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here