जळगाव : मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. आकाश सुरेश शिंदे आणि दुसरा आरोपी सूरज मुंवेद्रा दिवेदी असे अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. दोन्ही गुन्ह्यातील चोरीच्या मोटरसायकली दोघा चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, पो उप निरी चंद्रकांत झनके, सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, प्रदीप चौधरी, योगेश बारी, पोकॉ सिध्देश्वर डापकर, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहुल बेटे, योगेश घुगे, रतन गिते, छगन तायडे, किरण पाटील, ललीत नारखेडे, विशाल कोळी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.