जळगाव/दिल्ली दि.१८ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड ला (Engineering Export Promotion Council of India) EEPC इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी पुरस्कारांमध्ये कृषी यंत्रसामग्री आणि साहित्य (Agriculture Machinery & Parts – Large Enterprise category) मोठे उद्योग श्रेणीमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रतिष्ठित स्टार परफॉर्मर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यात वाढीसाठीच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जैन इरिगेशनला मिळाला. जागतिकस्तरावर कृषी तंत्रज्ञानात नावीन्य, गुणवत्ता व उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशनची वचनबद्धता अधोरेखित करणारा हा पुरस्कार आहे. शाश्वत कृषी उपाय आणि निर्यात उत्कृष्टतेमध्ये कृषी नव उपक्रमांना चालना देण्यासाठी जैन इरिगेशनचे स्थान आणखी मजबूत करणारा हा पुरस्कार म्हणता येईल.
दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या हस्ते जैन इरिगेशनचे बँकिंग व वित्त विभागाचे उपाध्यक्ष पियुष कुमट व संजय शर्मा यांनी जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी EEPC इंडियाचे अध्यक्ष पंकज चढ्ढा यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती होती.