फरार नक्षली नेता तुलसी यवतमाळ पोलीसांच्या ताब्यात

घाटंजी (यवतमाळ) अयनुद्दीन सोलंकी – झारखंड मध्ये अनेक गंभीर गुन्हे करुन फरार असलेला नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो यांस यवतमाळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 

पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो हा झारखंड मधून पळून यवतमाळ जिल्ह्यात आश्रयास असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक कुमार चिंता (IPS) यांनी गोपनीय यंत्रणेच्या मदतीने आरोपी तुलसी याचा मागोवा घेण्याचे आदेश यवतमाळ पोलीसांना दिले. आधुनिक तंत्रज्ञान व स्थानिक सूत्रांच्या मदतीने आरोपी तुलसी उर्फ दिलीप यांस पांढरकवडा, उमरी येथील एका स्टोन क्रेशर परिसरात असल्याची माहिती मिळाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळ पोलीसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष चवरे, पोलीस उप निरीक्षक गजानन राजमल्लू, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सैयद साजीद, पोहे रुपेश पाली, पोशि रवि नेवारे, राम कांबळे आदींचा समावेश करण्यात आला. झारखंड येथील नक्षलीनेता तुलसी उर्फ दिलीप महतो हा बनावट आधार कार्ड वापरून खोटी ओळख देऊन चौकशीच्या वेळी यवतमाळ पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्या संशयास्पद वर्तनूकीमुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. यवतमाळ पोलिसांनी आरोपीची कठोर चौकशी केल्याने आरोपी तुलसी उर्फ दिलीप महतो याने झारखंड येथील नक्षलवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे मान्य केले. नक्षली तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो यांचेवर झारखंड पोलीसांच्या नोंदीनुसार ३०२, ३०७, ३५३, ३७९, ४११, १२० (ब), २०१ अशा प्रकारच्या ७ गंभीर गुन्ह्याचा समावेश आहे. 

सदरची कारवाई  यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता (IPS), अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक गजानन राजमल्लू, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सैयद साजीद, बंडु डांगे, रवि नेवारे, रुपेश पाली, योगेश डगवार, आकाश सुर्यवंशी, राजकुमार कांबळे, देवेंद्र होले, योगेश टेकाम, धनंजय श्रीरामे व महेश वाकोडे या पोलीस पथकाने महत्वपुर्ण योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here