लोखंडी रॉडने हल्ल्यात पोलिस पाटील जखमी

काल्पनिक छायाचित्र

घाटंजी / यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – वणी तालुक्यातील मुकूटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिचघाट येथे किरकोळ कारणावरुन पोलीस पाटील पंढरी अरुण डुकरे यांच्या वर लोखंडी राॅडने झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष मोरेश्वर सरोदे यांच्याविरुद्ध मुकूटबन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ११८ (२), २९६ व ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपी मोरेश्वर सरोदे यांस मुकूटबन पोलीसांनी अटक केली आहे. 

मुकूटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडकडोह येथील शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष मोरेश्वर सरोदे व पोलीस पाटील पंढरी डुकरे यांच्यात किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामुळे पोलीस पाटील पंढरी डुकरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वणी येथील इस्पीतळात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  मुकूटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिलीप वडगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिलीप जाधव पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here