कुख्यात आरोपी ब्रॅन्ड व साहील स्थानबद्ध

घाटंजी / यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार साहील व ब्रॅन्ड यांचेवर एमपीडीए (MPDA) कायद्यातंर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. दोन्हीही आरोपींची छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. ब्रँन्ड उर्फ धिरज सुनील मैंद (वय २२) व साहील रफीक शेख (वय २५ रा. यवतमाळ) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नांव आहे.

ब्रॅन्ड उर्फ धिरजला बुधवारी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या डी. बी. पथकाने बाभुळगांव तालुक्यातील सिंधी येथुन ताब्यात घेण्यात आले. ब्रॅन्ड वर करण परोपटे खुन, मोहा फाटा येथील दरोडा, शासकीय रुग्णालयातील गुन्ह्यात सक्रीय सहभाग होता. तसेच त्याचेपासून देशी कट्टा सुद्धा जप्त करण्यात आला होता. यवतमाळ शहर परिसरात टोळीयुद्धात ब्रॅन्ड हा सक्रीय होता. या पुर्वी त्याचेवर मकोका अंतर्गत कारवाई होऊनही त्याचे वर्तनुकीत कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे यवतमाळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी एमपीडीए (MPDA) चा प्रस्ताव तयार केला. तर साहील रफीक शेख यांचे विरुद्ध शरीरांविरुद्ध दुखापतीचे ७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. साहील रफीक शेख ला ४ मार्च २०२५ रोजी नागपूर वरुन अटक करण्यात आली. संबंधित दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी एमपीडीए (MPDA) चा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे कडे सादर केला. जिल्हाधिकारी यांनी ३ मार्च २०२५ रोजी दोन्ही आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश पारीत केला. त्यावरुन दोन्ही आरोपींना अटक करुन छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव, पोलीस उप निरीक्षक धनराज हाके, स्वप्नील कावरे, पोलीस अंमलदार रविंद्र नेवारे, अंकुश फेंडर, सुनील पैठणे, राजकुमार कांबळे, डी. बी. पथकाचे जमादार रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, गौरव ठाकरे, अभिषेक वानखडे, पवन नांदेकर, कीरण पडघन व प्रदीप आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here