धुळे : शिरपूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्यांना मारहाण करणे पोलिस निरिक्षक कांतीलाल पाटील अर्थात के. के. पाटील यांच्या अंगाशी आले आहे. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्यांना निलंबीत केले आहे.
पोलिस निरिक्षक के के पाटील यांच्या चौकशीचे आदेश धुळे शहर उप विभागाचे पोलिस उप अधिक्षक राजकुमार उपासे यांच्याकडे देण्यात आले आहेत. या मारहाण प्रकरणाविरुद्ध पो.नि. कांतीलाल पाटील यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा १६०/२०२५ कलम ११५(२),३५२,३५१(२) अन्वये नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास साक्रीचे उप विभागीय पोलिस अधिक्षक संजय बांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलिस निरिक्षक के के पाटील यांच्या जागी पोलिस निरिक्षक जयपाल हिरे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. पो.नि. के के पाटील यांच्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिरपूर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला.