घाटंजी / यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी येथे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे लाईनमन दिन साजरा करण्यात आला. या वेळी घाटंजी शहरातून रॅली काढून विज सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.
सदर कार्यक्रमाला पांढरकवडा विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कटारे, घाटंजी विज वितरण कंपनीचे उप विभागीय अभियंता श्यामसुंदर कु-हा, तहसीलदार विजय साळवे (घाटंजी), नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड, घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे, घाटंजी शहर विभागाचे अभियंता गौरव किणाके, शिरोलीचे कनिष्ठ अभियंता अनुराग नैताम, पारवा विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता भारत चव्हाण, घाटंजी येथील ग्रामीण विभागाचे अभियंता प्रशांत, मोहदा विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सुरज देसाई आदीं उपस्थित होते. या वेळी घाटंजी येथील विज वितरण कंपनीचे उप अभियंता श्यामसुंदर कु-हा यांनी लाईनमन चा गणवेश परिधान केला होता. कार्यक्रमाचे संचालन धिरज पेटेवार यांनी केले.