जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून चोरी झालेल्या मोटरसायकलचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. चोरीच्या मोटरसायकल सह चोरट्यास जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोहसीन शहा सिकंदर शहा असे फुकटपुरा तांबापुरा येथील रहिवासी असलेल्या मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. अटकेतील मोहसीन शहा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या गुन्ह्यातील त्याचा पोलिस रेकॉर्ड वरील दुसरा साथीदार फरार आहे. पोलीस पथक त्याच्या मागावर आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, संजय हिवरकर, पोलीस हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेराव, हरिलाल पाटील, पोलीस चालक प्रमोद ठाकूर आदींनी या तपासात सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे करत आहेत.