जळगाव : पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्याचे भासवून दुसरे लग्न करणाऱ्या महिलेसह तिच्या माहेरच्या सदस्यांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील मुळ रहिवासी व फसवणूक झालेला फिर्यादी इसम सध्या बदलापूर येथे वास्तव्यास आहे. कोरोना कालावधीत त्याचे लग्न भुसावळ तालुक्यातील महिलेसोबत झाले.
या महिलेचा यापुर्वी विवाह झाला असून तिचा घटस्फोट झाला नसतांना लग्नाच्या वेळी झाला असल्याचे भासवण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित इसमाने भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला तिच्यासह तिच्या माहेरच्या सदस्यांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ योगेश पालवे करत आहेत.