आजचे राशी भविष्य (10/09/2020)

On: September 10, 2020 7:54 AM

आजचे राशी भविष्य

मेष

आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर थोडे लक्ष द्या. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे जीवनातील सर्व कष्ट विसरून जाल.

वृषभ

आज तुम्हाला धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. सकारात्मक विचारांचा पाठिंबा देणा-या मित्रांसोबत बाहेर जा. मित्रांच्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल.

 मिथुन

गुंतवणूक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम फायदा होऊ शकतो.

कर्क

प्रवासासाठी तुमची प्रकृती फारशी चांगली नाही. त्यासाठी लांबचे प्रवास शक्यतो टाळा. तुमच्या जोडीदाराच्या जीवनात तुमचे किती महत्त्व आहे, याची आज तुम्हाला प्रचिती येईल.

सिंह

प्रत्येक माणसांचे म्हणणे ऐकून घ्या. कदाचित त्यामधे तुमच्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर असू शकते. व्यापारात आज चांगला नफा मिळू शकतो.

कन्या

आशावादी राहून चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळेल. त्यामुळे आपल्या आशा आकांक्षा व स्वप्न प्रत्यक्षात येतील.

तुळ

बँकींग व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. व्यावसायिक भागीदाराच्या मदतीने प्रलंबीत कामे पुर्ण होवू शकतात.

वृश्चिक

शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही मैदानी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकाल.

धनु

घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. असे केल्यामुळे जीवनात नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. वादविवाद अथवा कार्यालयीन राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरे पडाल.

मकर

खेळणे हा आयुष्यातील एक महत्वाचा भाग असला तरी खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की, त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणावर होईल.

कुंभ

तुमचे मित्र तुमच्या दिलदार मनाची व सहनशक्तीची परीक्षा पाहतील. मात्र तत्त्वांना शरण जावु नका. विवेकी निर्णय घेण्याची काळजी घ्या.

मीन

धनाचे आगमन आज तुम्हाला अनेक आर्थिक संकटातून दूर करु शकते. तुम्ही घेत असलेल्या कष्टाचे चिज होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment