जळगाव : जैन हिल्स येथील एनर्जी पार्क परिसरातून पी व्ही सोलर केबल चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. शिरसोली येथील रहिवासी फैजल पिंजारी याने त्याच्या साथीदारांसह ही चोरी केली होती. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अविनाश देविदास बढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासणी त्याला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जैन हिल्स येथून 250 मिटर लांबीची सोलर केबल वायर वेळोवेळी चोरी झाली होती. तपासाअंती समजलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी फैजल रज्जाक पिंजारी याला ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या पथकाला शिरसोली येथील नेवरा धरण परिसरात दोन ते तीन दिवस थांबवून ठेवले होते.
पोलिसांच्या ताब्यातील फेजल याने हा गुन्हा त्याच्या साथीदारांसह केला असल्याचे कबूल केले आहे. गुन्ह्यातील मुद्धेमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाकळे करत आहेत. अटकेतील चोरट्यास न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, राहुल कोळी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. गुन्ह्यातील इतर फरार साथीदारांचा शोध सुरु असून पोलीस पथक त्यांच्या मागावर आहे.