एक लाखांच्या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

On: March 18, 2025 7:09 PM

यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील रहिवासी सुरेश जडगीलवार यांच्या दुचाकी वाहनाच्या पेट्रोल टाकीवरील पाकीटातून रोख १ लाख रुपये चोरुन नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दिनांक १८ मार्च २०२५ रोजी १.३० वाजेच्या सुमारास सुरेश जडगिलवार यांनी घाटंजी येथील महाराष्ट्र बँकेतून चेक वटवून रोख १,१८,०००/- रुपये काढले होते. त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलच्या पेट्रोल टाकीवरील कव्हरमध्ये त्यांनी एक लाख रूपये ठेवले होते. त्यानंतर घाटंजी येथीलच श्रीराम जनरल स्टोअर्ससमोर मोटार सायकल उभी करून ते बॅग घेण्यासाठी दुकानात गेले. बॅग घेवुन परत आल्यानंतर त्यांना पेट्रोल टाकीच्या कव्हरमधील एक लाख रुपये चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राहुल खंडागळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment