जळगाव : मोटार सायकल चोरीचा गुन्हा करुन फरार झालेल्या पोलिसांच्या अभिलेख्यावरील सराईत गुन्हेगारास एलसीबी पथकाने जेरबंद केले आहे. शेख शाहरुख शेख न्यामतुल्ला खाटीक असे लक्ष्मी नगर जळगाव येथील अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. पुढील तपासकामी त्याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
धरणगाव येथील रहिवासी शिक्षक सुभाष पिंताबर सोनवणे यांच्या मालकीची मोटार सायकल 31 ऑक्टोबर 2024 च्या रात्री चोरी झाली होती. या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मोटार सायकल चोरटा शेख शाहरुख हा फरार झाला होता. पोलिस पथक त्याच्या मागावर होते.
तपासा दरम्यान शाहरुख हा जळगाव शहरात आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांना हे.कॉ. जितेंद्र पाटील यांच्या मार्फत समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी ग्रेड पीएसआय अनिल जाधव, हे.कॉ. जितेंद्र पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे, पोलिस नाईक हेमंत पाटील व पो.कॉ. प्रदीप चवरे आदींना पुढील कारवाईकामी रवाना केले. शाहरुख यास फुले मार्केट परिसरातून ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध पुढील कारवाई करण्यात आली. त्याला पुढील तपासकामी धरणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.