सराईत गुन्हेगाराचा जमीनीत आढळला मृतदेह – भुसावळला खळबळ

On: March 21, 2025 9:05 PM

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सराईत गुन्हेगाराचा मृतदेह तापी नदी परिसरातील जमीनीत पुरल्याची घटना भुसावळला उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भुसावळ परिसरात खळबळ माजली आहे. मुकेश प्रकाश भालेराव असे जमीनीत पुरलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे समजते. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून हा प्रकार कुणी केला याबाबत तर्क वितर्क सुरु आहेत.

मुकेश भालेराव हा पोलिसांच्या अभिलेख्यावरील सराईत गुनहगार असून त्याच्याविरुद्ध यापुर्वी प्राणघातक हल्ला करणे, मारहाण, लुटमार खंडणी मागणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मयत मुकेश भालेराव हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता. त्यानंतर त्याचा मृतदेह तापी नदी परिसरात पुरल्याची माहिती समोर आली. त्याचा मृतदेह बाहेर काढून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे नेण्यात आला. या घटनेमागचे सत्य शोधून काढण्याचे काम पोलिस पथक करत आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment