चिखलवर्धा येथील विद्यार्थिनी इनाया विमान दौऱ्यास पात्र

यवतमाळ – घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या महादीप अंतिम परीक्षेत घाटंजी तालुक्यातील जि. प. उर्दू शाळा, चिखलवर्धा येथील विद्यार्थींनी इनाया वसीम पठान ही गुणवत्ता यादीत यवतमाळ जिल्ह्यातून प्रथम आली आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थी विद्यार्थिनींचा विमानाद्वारे दिल्ली व आग्रा येथे अभ्यास दौरा घेतला जाणार आहे. या विमान दौऱ्यात इनाया पठाण हिची निवड झाली आहे. त्यामुळे इनायाचा 21 मार्च रोजी यवतमाळ जिल्हा परिषद येथे सत्कार सोहळा झाला.

याप्रसंगी यवतमाळ जिल्ह्यातील उत्तीर्ण विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचा देखील सत्कार करण्यात आला. घाटंजी तालुक्यातील आदिवासी बहुल चिखलवर्धा गावातील विद्यार्थींनी यवतमाळ जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत पात्र ठरणे ही चिखलवर्धा गावासाठी अभिमानाची बाब म्हटली जात आहे. 

इनाया ही घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा गावातुन विमान दौऱ्यासाठी पात्र ठरणारी प्रथम विद्यार्थींनी आहे. आपल्या यशाचे श्रेय इनाया पठाण हिने जि.प. उच्च उर्दू शाळेतील मुख्याध्यापक नादीर सर, वर्ग शिक्षक व मार्गदर्शक मोहसीन चव्हाण सर व इतर शिक्षकांसह तसेच आई – वडिलांना दिले आहे. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here